श्रीगोंदा । प्रतिनिधी
भिमानदीकाठी असणार्या गावाना जोडणारा रस्ता म्हणजे निमगावखलु ते कौठा हा चार कि.मी.अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण काम अतिशय संथपणे व निकृष्ट पध्दतीने स्थानिक ठेकेदाराकडून चालु असुन चांगल्या कामासाठी स्थानिक ग्रामस्थांनी विचारणा केली तर संबंधित ठेकेदार अरेरावीची भाषा वापरुण दम देत आहे. यासाठी या गटातील जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी हा विषय गाभीर्याने घेऊन ठेकेदाराला सुचना करुण वरीष्ठ अधिकार्यांनी रस्ता काम चांगले झाल्याशिवाय बील काढू नये अशी मागणी मदन परकाळे यांच्या सह.ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्यातील अतिशय महत्त्वाचा रस्ता म्हणून भिमानदीकाठचा दळणवळण करण्यासाठी एकच रस्ता असल्याने या भागातुन ऊस, वाळू, तसेच पुढे श्रीक्षेत्र सिध्दटेक कडे पुढे रस्ता जातो परंतु निमगाव ते कौठा चार कि.मी.रस्ता राहिला असताना ते काम तालुक्यातील स्थानिक केठेदार करीत आहेत परंतु गेली एक महिण्यापासुन संथगतीने व निकृष्टपध्दतीने रस्त्याचे काम चालु आहे.रस्त्यावर एक सारखी दगडखडी न वापरता फक्त जेथे खड्डे आहेत तेथेच खडी टाकून मातीवर डांबर शिपंडून डांबरीकरण चालु आहे. हेच काम पुढे चालु असताना मागे पुन्हा खड्डे तयार होत आहे कारण माती व डांबर एकत्र राहत नाही. कामात डांबर कमी आणि खडी जास्त असल्याने कामाचा दर्जा निकृष्ट दिसुन येतोय कोटीचा निधी शासन खर्च करतेय पण ठेकेदार मात्र कमी श्रमात जास्त दाम मिळण्याच्या स्वार्थाने कामाचा दर्जा निकृष्ट होत असल्यामुळे चाललेला रस्ता जास्त दिवस टिकणार नाही यामध्ये शासनाचे नुकसान ग्रामस्थांना त्रास होणार म्हणून चाललेल्या कामा विषयी ठेकेदाराला विचारले तर ते म्हणतात रस्ता काम कसे कराचे आम्हांला माहिती आहे तुम्ही सुचना करु नका निधी नाही तरी आम्ही स्वांता खर्च करुण रस्ता तयार करतोय अशा पध्दतीने निधी नसताना ठेकेदार स्वाता खर्च करायला ठेकेदार उदार कसाकाय होतोय आमदार बबनराव पाचपुते यांनी याभागातील रस्ते चांगल्या दर्जाची होण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करुण निधी आनला जातोय परंतु त्याचा उपयोग योग्य पध्दतीने होताना दिसत नाही म्हणून या गटातील जिल्हा परिषद सदस्य सदाशिव पाचपुते यांनी रस्ता कामात लक्ष देऊन रस्त्याचे काम चांगले करुण येथील लोकांना न्याय देण्यासाठी ठेकेदाराला चांगली समज द्यावी आणि वरीष्ठ अधिकार्यांनी प्रत्यक्ष रस्ता कामाची पहाणी करुण बीले काढावी अन्यथा निकृष्ट रस्ता पाहून काम बंद साठी रस्ता रोको करु असा इशारा युवक कार्यकर्ते मदन परकाळे, गार संस्थेचे मा.अध्यक्ष अनिल मगर, नागवडे कारखाना मा.संचालक पोपट कोळसे, मा.सरपंच कुंडलिक भोसले,शरद चांदगुडे यांनी दिला आहे.
निमगावखलु ते कौठा रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे